बीडमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही असंच म्हणण्याची वेळ सामान्य नागरिकांवर आली आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यात नव्हे तर देशात चर्चेत ठरलेलं असताना पुन्हा एकदा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बीड वरून एसटी ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरात घडली आहे. या प्रकरणी चार आरोपींविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.