दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचा दावा कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केला आहे.. पंचनामे जलदगतीने सुरू असून संपूर्ण जिल्हा प्रशासन या कामात गुंतल्याचं त्यांनी सांगितलं.. पीक कापणी प्रयोग सुरू झाले असून यावेळी विमा कंपनीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहणार असल्याने शेतकऱ्यांचे दावे फेटाळणे कठीण जाईल, असं मांढरे म्हणाले.. 265 तालुक्यांची दुष्काळग्रस्त यादी ही पहिली यादी असून उर्वरित तालुक्यांचाही विचार केला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.. तसंच कर्जमाफीचे लाभ टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
Pune | Relief for farmers, aid provided, and damage assessments expedited; Agriculture Commissioner Suraj Mandhare asserts | Drought