पुण्यातील खराडीतल्या रेव्ह पार्टीप्रकरणी मोठी अपडेट समोर येतीय. खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींनी एकाच रात्री तीन पार्ट्या केल्याचं समोर आलं.शेवटच्या अफ्टर पार्टीपूर्वी आरोपींनी दोन पार्ट्या केल्या होत्या. खराडीला जाण्याआधी काही जणांनी कल्याणीनगरमधील पबमध्ये पार्टी केली होती. त्यानंतर त्यांनी मुंढवा इथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी झाली.त्यानंतर त्यांनी खराडी इथं स्टे बर्डमध्ये बुक केलेल्या सूटमध्ये पार्टी केलीय.. त्यावेळी पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केलीय.. यावेळी सात जणांना ताब्यात घेण्यात आलं.