Pune| Winners Academy तल्या विद्यार्थ्यांचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून मृत्यू, Academy बाहेर गर्दी

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावरून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पुण्यातील आळंदी येथून रायगडच्या दिवेआगर येथे सहलीसाठी आलेल्या 8 मुलांचा बुडून मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुण्यातील आळंदी येथील विनर्स अॅकेडमी या खासगी क्लासची सहल दिवेआगरमध्ये आली होती.यामध्ये 6 शिक्षक आणि 42 विद्यार्थ्यांचा समावेश होता. दिवेआगार येथील सहलीसाठी एकूण 42 विद्यार्थी आले होते. यापैकी आठ जणांचा मृत्यू झालाय.. दरम्यान या दुर्घटनेनंतर सुरक्षित असलेल्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ समोर आलाय..

संबंधित व्हिडीओ