पुण्यातील कोथरूड परिसरात 20 मीटर डीपी रस्त्याच्या प्रस्तावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. सर्व्हे क्रमांक 12 आणि 13 मधील या प्रस्तावित रस्त्यासाठी तब्बल 467 दुर्मिळ झाडांवर कुऱ्हाड चालणार असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. इतकेच नव्हे तर या कामामुळे परिसरातील ऐतिहासिक पेशवेकालीन चौकोनी बारव आणि विहिरीचे अस्तित्वही धोक्यात येणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शेकडो झाडांची कत्तल थांबवून हे वनक्षेत्र जतन करावे आणि या ठिकाणी पहिला बाजीराव पेशवा यांचा पुतळा उभारून स्मारक विकसित करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी.
Pune | Will 467 trees face the axe for a 20-meter DP road in Kothrud? Speaking with locals about this issue.