राहुल गांधी म्हणतात,माझी मर्जी, मी कुठेही बसेन, Rahul Gandhi मागण्या सतत बदलतायत-Jitendra Singh

राहुल गांधींनी त्यांच्या मागण्या बदलल्यात, असा आरोप केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी केलाय. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी आंदोलन करू नये, अशी विनंती जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधींना केली. त्यावेळी राहुल गांधींनी या मुद्द्यावर संसदेत चर्चा करावी, अशी मागणी केली. राहुल गांधींच्या या मागणीबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन राहुल गांधींना संसदेत चर्चेचं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले. आता माझ्या दोन मागण्या आहेत. एक म्हणजे संसदेत चर्चा आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा राहुल गांधी वारंवार त्यांच्या मागण्या बदलत असल्याचा आरोप जितेंद्र सिंग यांनी केला. या ठिकाणी आपण आंदोलनाला बसू नये, असं सांगितल्यावर माझी मर्जी मी कुठेही बसेन असं राहुल गांधी म्हणाल्याचा दावा जितेंद्र सिंह यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ