आंदोलन विद्यार्थ्यांचं, धुडगूस समाजकंटकांचा? दिल्लीतल्या आंदोलनाबद्दल एवढा संशयकल्लोळ का? एकिकडे विद्यार्थ्यांचं दिवसागणिक आक्रमक होत जाणारं आंदोलन, आणि दुसरीकडे पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांनी देशाच्या राजधानीत एका मोठ्या आंदोलनाची चालवलेली तयारी पाहता, केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्हं आहेत. विद्यार्थी आंदोलनाला मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहता सरकारने आंदोलन निपटून काढण्याच्या हालचाली सुरू केल्यात.त्यातच सीजेपीच्या आंदोलनाच्या हिंसेमागे समाज विघातक शक्तीचा हात असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे..पाहूयात दिल्लीतल्या आंदोलनात रंगलेला हा संशय कल्लोळ