रायगडच्या रोह्यातील कुंडलिका नदीने पुन्हा आज रुद्र रूप धारण केले आहे.नागोठणे रोहा मार्गांवरील कुंडलिका नदीचे दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद.दुपारी 2 नंतर कुंडलिका नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाढून जुन्या पुलावरून सुमारे 2 ते 2.5 फूट उंचीवर वाहत आहे. त्यामुळे सर्व वाहतूक शेजारी असलेल्या नवीन पुलावरून चालू होती. परंतु नवीन पुलावर काही खड्डे असल्याने दोन्ही पूल बंद ठेवण्यात आले.प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेट्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.रोहा तहसीलदार व नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन, फक्त अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा व पाण्याचा अंदाज घेऊनच हालचाल करा.