एकीकडे मराठवाड्यावर दुष्काळाचं संकट गडद होतंय. पावसाच्या लहरीपणामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत निसर्ग संवर्धनाचा संदेश घेऊन निघालेली वसुधरा दिंडी बीडच्या तेलगावमध्ये दाखल झाली. पाथरीतून सुरू झालेल्या या पर्यावरण दिंडीत हातात पर्यावरणाचा ध्वज आणि अंगावर पर्यावरण संदेश देणारी वेशभूषा साकारण्यात आली. ‘निसर्गाची सेवा हीच खरी साधना’, ‘प्रत्येक पाऊल वसुंधरेसाठी’ आणि ‘संकल्प पर्यावरण रक्षणाचा’ असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. महिला-पुरुषांचा मोठा सहभाग असलेल्या या दिंडीने बीडकरांचं लक्ष वेधून घेतलं. बीड जिल्ह्यात तीन दिवस ही दिंडी पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करणार आहे.