एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी संकटात आहे. दुसरीकडे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय. गेल्या महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत असताना सरकारनं इजिप्तमधून कांदा आयात केला. मुंबईच्या मार्केटमध्ये हा आयात केलेला कांदा आणल्यानं आता कांद्याचे दर पडण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राजू शेट्टींनी नाराजी दर्शवलीय.