बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार उद्यापासून सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत. रोहित पवार उद्या स्वर्गीय नेते अजित पवार यांच्या काटेवाडी गावात पहिली कोपरा बैठक घेणार आहेत.सकाळी नऊ वाजता रोहित पवार प्रचाराला सुरुवात करणार आहेत.उद्यापासून पुढे तीन दिवस रोहित पवार बारामती तालुक्यातील विविध भागात जाऊन कोपरा बैठकीच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार आहेत.अजित पवार यांच्या काटेवाडी गावातून रोहित पवार आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.