शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य केलंय.इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करतेय असं म्हणत आंदोलनकर्त्यांना सदाभाऊ खोत यांनी आंतकवाद्यांची उपमा दिलीय. तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नये अशी सदाभाऊ खोत यांनी मागणी केलीय. दरम्यान, या वक्तव्यावरून टीकेनंतर खोतांनी स्पष्टीकरण दिलंय.. मी आंदोलकांना दहशतवादी म्हणत नाही, असं त्यांनी म्हटलंय.