भारत-पाकमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तुळजाभावनी मंदिरात सुरक्षेचे नियम लागू करण्यात आलेत.मंदिर परिसरातही भाविकांच्या आणि मंदिराच्या सुरक्षेच्या कारणास्तव विशेष उपाययोजना करण्यात येतायत.परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात तुळजापुरात भाविक येत असतात. या सर्व भाविकांची आणि त्यांच्या सामानाची तपासणी होतेय.सुरक्षा गार्ड्स, मेटल डिटेक्टर, बॅग स्कॅन करूनच प्रवाशांना मंदिरात प्रवेश देण्यात येतोय.