अजित पवार यांच्या उपस्थितीत नांदेडमधील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रतापराव पाटील चिखलीकर आल्यापासून तीन हजाराहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. मुखेड येथील चव्हाणवाडी येथे पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवा प्रस्ताव असल्याची माहिती दिली. सरकार बँकांशी चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी भांडवल 30 ते 40 हजार रुपयांचं भांडवल उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे. लाडक्या बहिणींना दिले जाणेर 1500 रुपये बँकांकडे जमा होतील, असं अजित पवार म्हणाले.