India Pakistan Tension| शस्त्रसंधीआधी पडद्यामागे काय? शस्त्रसंधीचा टर्निंग पॉईंट कोणता? | NDTV मराठी

(Disclaimer - Deferred Visuals) #IndiaPakistanNews #NDTVMarathi #MarathiNews भारताच्या तिन्ही सैन्य दलाची पत्रकार परिषद पार पडलीय. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानी सैन्यानं फोन करुन शस्त्रसंधीची मागणी केल्याचं सांगण्यात आलं.आमचा पहिला प्रयत्न शांतीचा असतो मात्र पाकिस्तानने आगळीक केली तर चोख उत्तर देऊ, असा सज्जड दम भारतीय सैन्याकडून देण्यात आलाय.यावेळी 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आली. पहलगाम हल्ल्याविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं.. या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादाला नष्ट करण्याचे भारताचं लक्ष्य होते.आम्ही फक्त दहशतवादी अड्ड्यांना लक्ष केलं. मात्र पाकच्या निशाण्यावर भारताचं सैन्यदल ही होतं.पाकिस्ताननं भारताच्या एअरबसवरही हल्ले केले मात्र ते हल्ले भारताने उधळून लावल्याची माहिती तिन्ही सैन्य दलाने दिलीय.. 'आम्ही लक्ष्य साधलं, मृतांचा आकडा त्यांनी मोजावा, अशा शब्दात सैन्य अधिकाऱ्यांनी निशाणा साधलाय.दरम्यान जर पाकिस्तानने पुन्हा हिंमत केली तर धडा शिकवू.. तो धडा किती भयानक असेल यांची कल्पनाही पाकिस्तान करणार नाही असा सज्जड दमच नौदल अधिकाऱ्यांनी दिलाय.

संबंधित व्हिडीओ