Pune मध्ये PMPL बसेसची भीषण अवस्था; चक्क धावत्या बसचा टायर निखळला, भोर तालुक्यातील घोरेपडळ इथली घटना

पुण्यात पीएमपीएल बसमधून प्रवास कऱणाऱ्या नागरिकांची सुरक्षा रामभरोसे असल्याची एक प्रकार समोर आलाय.. पुण्याच्या भोर तालुक्यातील घोरेपडळ इथे वेल्ह्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या PMPML बसचा अचानक टायर निखळला. त्यामुळे बसला जोरात झटका बसून या बसची पुढची मुख्य काचही निखळून रस्त्यावर पडलीय.यावेळी बस मध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते..सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही..तसेच चाकं निखळले तेव्हा रस्त्यावरही कोणतेच वाहन नसल्याने अनर्थ टाळलाय. या घटनेमुळे बसच्या स्थितीबाबत आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित झालंय.या मार्गावर चांगल्या स्थितीतील बस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

संबंधित व्हिडीओ