ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवलं. लोकमान्य नगर परिसरात प्रचारावेळी अडवलं.ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील लोकमान्य नगर परिसरात शिवसेना (शिंदे गट) यांच्या माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांना स्थानिक नागरिकांनी प्रचार करताना अडवले. “विकास निधीच्या बाबतीत संपूर्ण ठाणे शहर तुपाशी, आमचा पाडा का उपाशी? असा सवाल करत स्थानिक नागरिकांनी परिसरात पोस्टरबाजी केली.