गेल्या पाच दिवसात भीमा नदीच्या आणि नीरा नदीच्या खोऱ्यात माजलेल्या दमदार पावसामुळे आता नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या नीरा नदीच्या पात्रात 26 हजार 525 क्युसेक्य इतका विसर्ग प्रवाहित होत आहे. अशा परिस्थितीत नीरा आणि भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. परिणामी सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.