यंदाचा दुष्काळ लोकांच्या जीवावर उठलाय. लातूरजवळच्या एका गावात राहणाऱ्या मनकाबाई लोंढेंना जिवंतपणी मुलगा आणि सूनेचा अंत्यविधी पाहावा लागला. त्यामुळे त्या आधीच मोडून पडल्या होत्या. हे दुःख पचवून जगण्यासाठीचा संघर्ष करत असताना आता मायक्रो फायनान्स कंपनीचा त्यांच्यामागे ससेमिरा लागलाय.