मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे चारचाकीवाल्या 'बहिणीं'ची यादी आली आहे. शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील ७५ हजार १०० लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाले आहे. या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका 'बहिणीं'च्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. राज्य शासनाकडून प्रत्येक परिवहन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली. या याद्यांनुसार प्रत्येक जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन पडताळणी करणार आहेत. पुणे जिल्ह्यासाठीच्या दोन याद्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आल्या आहेत.