एसटी, रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाढीनंतर आता सामान्य घरातील पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.आता शाळेच्या बसचं भाडं 18 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. शालेय बस उत्पादकांकडून बस आणि सुट्या भागांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.स्कूल बस ऑपरेटर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलाय.