नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आनंद पटेल याचा पिताही मोठा गुन्हेगार असल्याची माहिती समोर आलीये.. लखन पटेल असं त्याचं नाव असून कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात लखन पटेल याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत... रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार आणि संघटित गुन्हेगारी म्हणजे मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. कल्याण मधून आनंद पटेल याच्या अटकेनंतर ज्या परिसरात आनंद पटेल राहतो त्या मोहन हाईट मधील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. लखन पटेल हा गुन्हेगार तर होताच पण मुलगा आनंद देखील येवढ्या मोठ्या प्रकरणात अडकल्याने रहिवाशांना आश्चर्य वाटत आहे..