टिटवाळा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी गणेश परदेशी नामक पोलीस कर्मचाऱ्याविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस कर्मचारी ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असून, पीडित मुलगी त्याची नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, टिटवाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. तपासातून नेमकी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.