भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षात युद्धविरामाचं आणि शस्त्रसंधीचं वळण आलेलं असतानाच भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ एकमेकांशी चर्चाही करणार आहेत. या चर्चे आधी भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत डायरेक्टर जनरल जनरल ओएफ मिलिट्री ऑपरेशन्स चे प्रमुख राजीव घई आणि एअर मार्शल ए के भारती तसंच वाईस एडमिरल ए एन प्रमोद यांनी भारतीय सैन्याच्या ऑपरेशन्स ची सविस्तर माहिती दिली याशिवाय येत्या काळात पाकिस्तान विरोधात भारताची भूमिका कशी असेल हे देखील तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.