Vasai | LPG Shortage | वसईत घरगुती सिलिंडरचा हॉटेलसाठी वापर, अन्न पुरवठा विभागाची वाळीवमध्ये धाड

हॉटेल्सना व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा सर्रास वापर केला जातोय. अन्न पुरवठा विभागाने असाच प्रकार वसईत उघडकीस आणलाय. वाळीव परिसरातल्या लझिज हॉटेलवर छापा टाकत घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या तिघांना अटक केलीय. या तिघांवर पेल्हार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. घरगुती गॅसचा गैरवापर आढळल्यास नागरिकांनी पुरवठा विभागाला कळवावं, असं आवाहन प्रशासनाने केलंय.

संबंधित व्हिडीओ