Washim| शेगाव पालखीच्या स्वागतासाठी रिसोड सज्ज, भाविकांसाठी 40 हजार लाडूंचा महाप्रसाद

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे उद्या वाशिमच्या रिसोड शहरात आगमन होणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात सज्ज झालंय.तर विविध ठिकाणी स्वागत कमानी, रांगोळ्या आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वारकरी आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलंय.यंदा तब्बल ४० हजार लाडू तयार करण्यात आले आहेत. हजारो वारकरी आणि भाविकांना लाडूसह महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, रिसोड हा पालखीचा वाशिम जिल्ह्यातील चौथा आणि अखेरचा मुक्काम असून, दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे.

संबंधित व्हिडीओ