TET पेपरफुटी प्रकरणावरून विधानसभेत चर्चा; भविष्यात पेपरफुटी प्रकरणात मकोका लावण्याचा इशारा

पेपरफुटी प्रकरणात यापुढे मकोकांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंनी विधानसभेत केलीय. टीईटी पेपरफुटीवर निवदेन देताना, त्यांनी ही घोषणा केली. मात्र सरकारचा निषेध म्हणून विरोधकांनी यावेळी सभात्याग केला. या प्रकरणात 3 जणांना अटक केली असून एसआयटीकडून तपास सुरू आहे, एसआयटीची तीन पथकं बिहार, हरियाणा आणि दिल्लीत तपासासाठी रवाना झाल्याची माहितीही भुसेंनी दिलीय. विशेष म्हणजे या मुद्द्यावरून सत्ताधारी बाकावरील आमदारही आक्रमक झाले होते. 'महाराष्ट्रात नोटा छापल्या जात असतील तर पेपर उत्तर प्रदेशच्या आग्र्यामध्ये का छापले जातात, असा सवाल सत्ताधारी आमदारांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना यापुढे ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी एक समिती गठीत करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली..

संबंधित व्हिडीओ