Rain Alert| कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, रायगडला Orange Alert; पावसासंदर्भात घेतलेला आढावा

राज्यात मान्सूनचा वेग सध्या मंदावलेला असला तरी पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय… २३ ते २५ जूनदरम्यान मुंबईसह काही भागात दमदार पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर काही ठिकाणी पावसात खंड पडल्याचं दिसून येतंय. हवामान तज्ञ सुषमा नायर यांच्या माहितीनुसार, सध्या अनुकूल परिस्थिती नसल्याने पावसाचा वेग कमी आहे… कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय… तसंच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी

संबंधित व्हिडीओ