Nasrapur Incident|आरोपी कांबळेला फाशी,न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ, महिलांनी मानले न्यायालयाचे आभार

पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर राज्यभरातून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत… वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या पूजेसाठी आलेल्या महिलांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे… अशा कठोर शिक्षेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत आणि न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली… आरोपींना कठोर शिक्षा झाल्यास गुन्हेगारांना धडा मिळेल, असंही महिलांनी स्पष्ट केलं… याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी महिलांशी संवाद साधला आहे

संबंधित व्हिडीओ