जून अखेर झालेल्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम पेरण्यांना वेग आला असला तरी पुढील तीन महिने शेतकऱ्यांसाठी डोके दुखीचं ठरण्याची चिन्हं आहेत...काही दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर आठवड्यावर किंवा त्याहून अधिक काळ कोरड्या वातावरणाची शक्यता आहे...सोयाबीन कापूस आणि तूर या प्रमुख खरीप पिकासमोर नव्या आव्हानाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे...याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी..