केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य करण्यासाठी पीएम किसान योजना राबविली जाते...यात शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्ते प्रति दोन हजार प्रमाणे अर्थ सहाय्य म्हणून दिला जातो..मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात चक्क एक पैसा आल्याचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला आहे..त्यामुळे शेतकऱ्याकडून संताप व्यक्त होत आहे...ही आर्थिक मदत आहे का आमची थट्टा असा सवाल आता शेतकरी करत आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभय भुते यांनी..