अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. मात्र आता हे प्रकरण अधिकृतपणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा मुंबई पोलीस विभाग शोध घेत आहे. याप्रकरणी वापरलेली दुचाकी काल जप्त करण्यात आली आहे. अद्याप दोन्ही आरोपी फरार आहेत. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी 2 डझनहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. या दोन्ही आरोपींचे काही प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाचा क्राइम ब्रांच तपास करणार !
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केल्यानंतर आरोपी घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माउंट मेरी चर्चजवळ बाईक ठेवून निघून गेले. तिथून त्या आरोपींनी सार्वजनिक वाहतुकीच्या मदतीने वांद्रे स्थानक गाठले आणि तेथून पळ काढली. त्यानंतरर पोलिसांनी बाईक जप्त केल्या. गोळीबार करणाऱ्यांना रसद पुरवणाऱ्यांचा पोलिस आता शोध घेत आहेत. दोन्ही आरोपी मुंबईबाहेर गेल्याचा पोलिसांना संशय आहे.
दोन्ही आरोपींपैकी एक गुरुग्राम येथील असल्याचा संशय आहे. दिल्ली पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकृत सूत्राने सांगितले की, दोन आरोपींपैकी एक आरोपी गुरुग्रामचा असल्याचा संशय आहे, जो हरियाणातील अनेक खून आणि दरोड्याच्या घटनांमध्ये सामील आहे. मार्च महिन्यात गुरुग्राम येथील व्यापारी सचिन मुंजाल यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी तो वॉन्टेड आहे. वांद्रे पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 307 अंतर्गत "अज्ञात व्यक्ती" विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world