जाहिरात

Central Railway : ठाणे ते कर्जत-कसारादरम्यान गर्दी कमी होणार? रेल्वे मंत्र्यांचं मोठं पाऊल

मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनावरही टीका केली होती.

Central Railway : ठाणे ते कर्जत-कसारादरम्यान गर्दी कमी होणार? रेल्वे मंत्र्यांचं मोठं पाऊल
मुंबई:

मध्य रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनावरही टीका केली होती. लोकलमधून जनावरांप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करता आणि तुमची पाठ थोपटावी, अशा अपेक्षा करता असं म्हणत उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले. त्यामुळे मध्य रेल्वेवरील बोजा कमी करण्यासाठी लोकलची संख्या वाढवणे किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 

मध्य रेल्वे कायम उशिरा असल्याने नोकरदार वर्गाला याचा मोठा फटका सहन करावा लागतो. त्याशिवाय कर्जत-कसारा येथे जाणाऱ्या लोकलची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे प्रवाशांची मनस्ताप सहन करावा लागतो. त्याशिवाय गर्दीमुळे प्रवाशांना लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागतो. यामध्ये आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजन आखणं आवश्यक आहे. 

नक्की वाचा - अतिउत्साह नडला, एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

दरम्यान याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाऊल उचललं आहे. ठाणे ते कर्जत-कसारा किंवा सीएसएमटी ते ठाणे-कसारा या मार्गावर मर्यादित लोकल आहेत. त्यामुळे ठाण्यातून कर्जत-कसारा शटल सेवा सुरू करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मध्य रेल्वेकडून शटल सेवा सुरू करण्याबाबत विचार केला जात आहे. शटल सेवा सुरू झाल्यास गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश  येईल. 19 वर्षांपूर्वी 26 जुलै रोजी ढगफुटी झाली तेव्हा ठाणे ते कर्जत - कसारादरम्यान मध्य रेल्वे कोलमडली होती. अशावेळी  प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे ते कर्जत - कसारादरम्यान शटल सेवा सुरू करण्यात आली होती. त्याप्रमाणे आताही शटल सुरू केली जाऊ शकते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याबरोबर महत्त्वाची बैठक पार पडली आहे. उच्च न्यायालयाने रेल्वेवर ताशेरे ओढल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com