Mumbai Rain : आला रे आला, मुंबईकरांची प्रतीक्षा संपली; पुढील 4 दिवस पावसाचा जोर

Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यभरात (Mumbai Rain) मान्सून सक्रिय होत असून अखेर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईसह राज्यभरात (Mumbai Rain) मान्सून सक्रिय होत असून अखेर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली आहे. पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज सकाळपासून मुंबईतील वांद्रे, मालाड, बोरीवली, मुलुंड, ठाणे या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 

राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून, यात कोकणातील (Maharashtra Rain Update) जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह लगतच्या भागात पावसाने रिमझिम का होईना हजेरी लावली आहे. मुंबईच्या तुलनेत मुंबई महानगर प्रदेशात पावसाचा जोर अधिक असेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

नक्की वाचा - अटल सेतूसाठी आता मनसे मैदानात; सेतूच्या सुरक्षिततेसाठी उघडली मोहीम

मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ हवामान कायम असल्याचं दिसून येत आहे. रविवारी (23 जून) सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे

Advertisement

पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान कोल्हापूर सातारा परिसरात जोरदार पाऊस झाला असून पंचगंगेच्या पातळीत दिवसात 4 फुटांची वाढ झाली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यातही एक टीएमसीने वाढ झाली आहे.