Rain Update : पुन्हा पाऊस सैराट; आज सकाळपासून मुंबई, कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात

Rain Update : पुढील तीन दिवस काय आहे पावसाचा अंदाज?

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात (Maharashtra Rain Update) जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन् काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि जिल्ह्यांतील काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

दक्षिण कोकण - गोवा या भागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तास मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे कमाल आणि किमान तापमान 31 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस कोकणासह घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

नक्की वाचा - हिंदूंचे 7 अन् मुस्लिमांचे 7 ताबूत; सांगलीत मोहरमची दीडशे वर्षे जुनी अनोखी परंपरा

गुरूवार 18 जुलै रोजी संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. विदर्भात गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील नागपूरसह वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा गोंदिया या जिल्ह्यांत सर्वत्र पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Advertisement

विदर्भात अकोला येथे काही ठिकाणी एक दोन सरी तर अन्यत्र नागपूरसह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात दिवसभरात काही वेळेच्या अंतराने अधून मधून पावसाची शक्यता आहे. गुरूवार 18 जुलै रोजी विदर्भातील कमाल तापमान 28 ते 32 डिग्री दरम्यान राहणार असल्याचं अपेक्षित आहे. किमान तापमान 22 ते 25 डिग्रीदरम्यान राहण्याची शक्यता असून यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान 19 डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.