जाहिरात
This Article is From Jun 04, 2024

लोकसभेची कसर विधानसभा निवडणुकीत भरून काढू, निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

लोकसभेची कसर विधानसभा निवडणुकीत भरून काढू, निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभा निवडणुकीत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर भरून काढू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.  

(नक्की वाचा - Winning Candidate List : राज्यातील सर्व 48 विजयी उमेदवारांची नावे)

इंडि आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले. या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.

(नक्की वाचा - रायबरेली की वायनाड मतदार संघ सोडणार? राहुल गांधी थेट बोलले)

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे नरेंद्र मोदीजींना साथ दिली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर भरून काढू, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा - अयोध्येत राममंदिर उभारलं, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव; या निकालाने देशाचं वारंच बदललं)

महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत. त्या सर्वांचे आभार देवेंद्र फडणवीस यांनी मानले.

व्हिडीओ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: