जाहिरात
Story ProgressBack

भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी आजचा दिवस का निवडला?

Read Time: 3 min
भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी आजचा दिवस का निवडला?
भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी आजचा दिवस का निवडला?
मुंबई:

भारतीय जनता पक्षाने आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने 'संकल्प पत्र' या नावाने जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. मोदी की गारंटी हा संकल्पपत्राचा केंद्रबिंदू आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयातून 'संकल्प पत्रा'ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर लक्ष्य केंद्रित केले यावर एक नजर टाकूया.

जाहिरनाम्यातील ठळक वैशिष्ट्ये 

भाजपने जाहीरनाम्यात गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी केंद्राच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना संकल्प पत्रेही दिली.

3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा भाजपचा संकल्प !

'वन नेशन वन इलेक्शन' साकारण्याचे वचन ' जाहिरनाम्यात देण्यात आले आहे. भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. वंचित वर्गाला प्राधान्य दिले जाणार.  2025 हे वर्ष आदिवासी गौरव म्हणून घोषित करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याच बरोबर ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. 

'3 कोटी नवीन घरे, ट्रान्सजेंडर्सनाही आयुष्मान योजनेत आणले जाईल', BJPच्या जाहिरनाम्यातील मोठ्या गोष्टी

आता एक नव्हे तीन प्रकारच्या वंदे भारत धावणार !

वंदे भारत ट्रेनचा देशभरात विस्तार करण्यात येणार आहे. स्लीपर, चेअरकार आणि मेट्रो वंदे भारत अशा तीन प्रकारच्या  वंदे भारत ट्रेन भारतात धावणार. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर या तीन प्रकारच्या पायाभूत सुविधांसह भाजप २१व्या शतकातील भारताचा पाया मजबूत करणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. सामाजिक पायाभूत सुविधांसाठी नवीन शिक्षण संस्था, विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यात येणार. भौतिक पायाभूत सुविधांसाठी देशभरात महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्गांचे आधुनिकीकरण केले जाणार. डिजिटल पायाभूत सुविधांसाठी, 5G चा विस्तार केला जाणार 6G वर काम सुरु आहे, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाखांवर !

मुद्रा योजनेंतर्गत कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. सत्तेत आल्यास स्वयंपाकाचा गॅस पाईपद्वारे घरोघरी पोहोचवला जाईल आणि गरिबांना पौष्टिक आणि परवडेल असे अन्न पुरवले जाण्याचा आश्वासन देण्यात आलं आहे. गरिबांसाठी आणखी 3 कोटी घरे बांधली जाणार, जनऔषधी केंद्रांचा आणखी विस्तार करणार, विजेपासून रोजगाराच्या संधी निर्माण करून करोडो कुटुंबांचे वीज बिल शून्यावर आणण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा आयुष्मान भारत योजनेत समावेश !

७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेत समावेश करण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. याशिवाय, आयुष्मान भारत योजनेंतर्गत तृतीयपंथाना आणण्याचेही आश्वासन देण्यात आलं आहे. 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी भारताला अन्नप्रक्रिया केंद्र बनवण्याचे लक्ष्य आहे. महिलांना होम स्टेसाठी आर्थिक मदत दिली जाईल. 2036 मध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात आहे. 

One Nation, One Election चा निर्धार !

भाजप, समान नागरी कायद्याच्या दृढसंकल्पावर कायम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. One Nation, One Election हा सुद्धा महत्वाचा मुद्दा भाजपसमोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप बहुमताने निवडून आल्यावर पहिल्या टप्प्यात भाजप या मुद्यांना हात घालणार असल्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. 

नेमका आजचा दिवस का?

भाजपने नेमका आजचा दिवस निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे, आज रविवार आहे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती सुद्धा आहे. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जाहिरनामा प्रसिद्ध करणे म्हणजे अनेकांचे लक्ष्य वेधून घेण्यासारखे आहे. आज रविवार सुट्टी असल्याने अनेकांना हा जाहिरनामा प्रसिद्ध होताना पाहता येईल अशी भाजपची विचारसरणी आहे. 

MI vs CSK मॅचचा बदलणार इतिहास! 17 वर्षांमध्ये पहिल्यांदाच दिसणार 'हे' चित्र

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination