जाहिरात
This Article is From Apr 21, 2024

झाडाला मिठी मारायचीय, 1500 रूपये द्या! कंपनीची जाहिरात अन् सगळीकडे खळबळ

झाडाला मिठी मारायचीय, 1500 रूपये द्या! कंपनीची जाहिरात अन् सगळीकडे खळबळ
झाडाला मिठी मारायचीय, 1500 रूपये द्या! कंपनीची जाहिरात अन् सगळीकडे खळबळ
बंगळुरू:

धावत्या जीवनशैलीच्या ताणतणावांमध्ये आराम हा गरजेचा असतो. आराम करण्यासाठी प्रत्येकाकडे वेगवेगळे उपाय असतात. काही जण आराम करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जातात. झाडांच्या पानांशी, मुळांशी, फुलांशी खेळतात व बोलतात. हा पर्याय तणावापासून लांब राहण्यासाठी अगदी उत्तम आहे. निसर्गाशी प्रेम करणाऱ्यांन तणाव जाणवत नाही हे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना निसर्गाशी संपर्क साधण्यासाठी वेळ आणि शांत वातावरण शोधणे खूप कठीण आहे. उद्याने शहरी जीवनापासून तात्पुरती विश्रांती देतात, परंतु बऱ्याचदा निसर्गाच्या सानिध्यात जास्तकाळ राहण्याची इच्छा पूर्ण करत नाहीत. 

(नक्की वाचा :  आता 65 वर्षांवरील नागरिकही खरेदी करु शकणार आरोग्य विमा)

लोकांना शिनरीन योकू या जपानी 'फॉरेस्ट बॉथिंग'चे महत्त्व पटले आहे. या फॉरेस्ट बाथमध्ये लोकांनी संवेदनशील होऊन आपल्या अनुभवांवर लक्ष केंद्रित करत जंगलात फेरफटका मारावा. फॉरेस्ट बाथचे समर्थक म्हणतात की यामुळे तणाव कमी होतो आणि जीवनात सर्वांगीण सुधारणा ही होते. 

(नक्की वाचा :  कोट्यवधी कारचे रिक्षात रूपांतर, व्हिडीओ इंटरनेटवर VIRAL)

बंगळुरूमध्ये फॉरेस्ट बाथच्या अनुभवावरून ऑनलाइन वाद

देशात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने फॉरेस्ट बाथबाबत ऑनलाइन वादाला सुरु आहे. बंगळुरूची एक कंपनी 1,500 रुपये शुल्क देऊन लोकांना फॉरेस्ट बाथ विषयी मार्गदर्शन करण्याची ऑफर देत आहे. यामुळे काही सोशल मीडिया यूजर्स संतप्त झाले आहेत. कंपनीच्या जाहिरातीचा स्क्रीनशॉट आणि त्याची किंमत व्हायरल झाली आहे. अनेक लोक त्या जपानी पद्धतीचा विरोध करत आहेत. लोकांचं मते हा उपाय प्रत्येकासाठी विनामूल्य उपलब्ध असावे.

वापरकर्त्यांची प्रतिक्रिया ...

ट्विटरवर जोलाड रोट्टी या वापरकर्त्याने स्क्रीनशॉट शेअर करत Babe, Wake Up! There's A New Scam In The Market अशी पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली आणि ऑनलाइन चर्चेला उधाण मिळाले आहे. पुढे कमेंट सेक्शनमध्ये त्याच यूजरने लिहिले की, 'तुम्ही झाडांना मिठी मारून आणि त्यांच्या सावलीत वेळ घालवून निसर्गाशी कनेक्ट व्हा. हे सर्व चांगले आहे, परंतु सार्वजनिक मालमत्तेवर 1,500 रुपये इतके भरमसाठ शुल्क आकारणे हे काय बरोबर नाही. दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंटमध्ये लिहिले की, 'उत्तम उपाय म्हणजे उद्यानात जाणे, कचरा न टाकणे आणि कचरापेटीमधील कचऱ्याचा योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे होय.'

नक्की पाहा :साताऱ्याची लढत उदयनराजेंसाठी किती सोपी किती कठीण? पाहा EXCLUSIVE मुलाखत | 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com