नाशिक: 'या दाढीच्या नादी लागू नका. महाविकास आघाडी खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही अशी दाढी आहे,' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नाशिकच्या मालेगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचेच उमेदवार अद्वय हिरे यांच्यावरही सडकून टीका केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
'सभेला माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आले आहेत. लाडके शेतकरी आहेत. लाडके मतदार हे आहेत. मालेगावकर आणि दादा भुसे यांचे समीकरण एक नातं आहे. मालेगाववर बाळासाहेबांनी प्रेम केलं. मालेगाववर दिघे साहेबांचे प्रेम आहे. या दोघांचा चेला मी एकनाथ शिंदे आहे. बाळासाहेबांचे विचारांचे धनुष्यबाणासमोरचे बटन दाबा. पाचव्यांदा दादा भुसे यांना निवडून द्या आपण बाळासाहेबांचे विचाराची पाईक आहे. या धनुष्यबाणाने 20 तारखेला यांचा कायमचा बंदोबस्त करायचा..' असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
उद्धव ठाकरेंवर टीका
'काही दिवसांपूर्वी इथे कोणीतरी येऊन गेले. दादा भुसेला म्हटले तुमचा भुसा पाडतो. तुमचा भुसा एकनाथ शिंदेने दोन वर्षांपूर्वीच पाडलाय. दादाच्या दाढीवर जाऊ नका. दादाची पांढरी माझी काळी आहे. या दाढीची करामत तुम्ही बघितली आहे या दाढीच्या नादी लागू नका. महाविकास आघाडी खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही अशी दाढी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मालेगावात भगव्याचे राज्य आहे धनुष्यबाणाचे राज्य राहणार आहे. दादा भुसे हा सेवेकरी आहे त्याला पुन्हा निवडून द्या. दुसरा उमेदवार कोण आहे हिरे? मी अगोदर सांगितले हिऱ्याच्या पोटी गारगोटी. दादाच्या पांढऱ्या दाढीसमोर यांची सगळ्यांचे चेहरे काळे पांढरे पडले आहे. हा बाळासाहेबांचा चेला आहे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. जेव्हा तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले साहेबांच्या विचाराची प्रथम केली केली. बाळासाहेबांचे विचार सोडून मुख्यमंत्री पदासाठी जनतेच्या मनातील सरकारसोबत बेईमानी केली.शिवसेना आणि धनुष्यबाण तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधले, ते आम्ही सोडवले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाची बातमी: 'काँग्रेसमधली बंडखोरी भाजप पुरस्कृत' सांगलीत आता नवा वाद
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world