जाहिरात

राज्यकर्त्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, पुन्हा सत्ता द्यायची नाही', फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले

नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अनिल देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी तसेच महागाई आणि महिला सुरक्षेवरुन सरकारवर हल्लाबोल केला. 

राज्यकर्त्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, पुन्हा सत्ता द्यायची नाही', फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार कडाडले
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी:

  'जे राज्यकर्ते शेतकऱ्यांकडे बघू शकत नाहीत, कष्टकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाहीत. स्त्रियांना संरक्षण देऊ शकत नाहीत. तरुणांच्या हाताला काम देऊ शकत नाहीत, अशांच्या हातात सत्ता द्यायची नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल,' असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.  नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अनिल देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी तसेच महागाई आणि महिला सुरक्षेवरुन सरकारवर हल्लाबोल केला. 

काय म्हणाले शरद पवार? 

"आजचा दिवस महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांसाठीच्या विदर्भातील प्रचाराचा पहिला दिवस आहे. नागपूर हे देशामधील वेगळे शहर आहे. नागपूर शहर आणि काँग्रेसच्या विचारधारेची एक वेगळे नाते आहे. याच नागपुरात काँग्रेस विचारधारा जपणाऱ्या लोकांनी देशासाठी मोठे बलिदान गेले. १ मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. कै. यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर विदर्भातील तीन ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिले," असं शरद पवार म्हणाले. 

नक्की वाचा: ठाकरे गटाचा वचनमाना जाहीर; उद्धव ठाकरेंनी काय दिलीत आश्वासने?

"अलिकडच्या काळात राजकारण बदलत गेले. कधीनव्हे ते भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात पाहायला मिळाले. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी प्रश्नांची सोडवणूक केली नाही. शेतात कष्ट करणारा शेतकरी आज संकटात आहे.  शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही, विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या मोठी आहे. जो घाम गाळतो, आपल्या शेतीमध्ये धान्य पिकवतो. कष्ट करतो देशाच्या अन्नाची गरज भागवणाऱ्या कष्टकऱ्याला आत्महत्येच्या रस्त्यावर जावे लागले. याचे कारण त्याच्या घामाची, कष्टाची किंमत देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनी या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहिले नाही," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

"देशामध्ये महाराष्ट्र राज्य १ नंबरला होता,  जो महाराष्ट्र १ नंबरला होता, तो आता सहाव्या क्रमांकावर आहे. आजच्या काळात ही स्थिती, कायदा व्यवस्थेची स्थितीही तीच आहे. गेल्या ६ महिन्यात नागपूर आणि आजूबाजूच्या भागातून ६३० महिला आणि मुली गायब झाल्यात, त्यांचा पत्ता लागत नाही. आज स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे, त्याची पुर्तता त्यांच्याकडून होत नाही. जे राज्यकर्ते शेतकऱ्याकडे बघू शकत नाहीत, कष्टकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाहीत. स्त्रियांना संरक्षण देऊ शकत नाहीत. तरुणांच्या हाताला काम देऊ शकत नाहीत, अशांच्या हातात सत्ता द्यायची नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल, असे आवाहनही शरद पवार यांनी केले. 

ट्रेडिंग बातमी: शिंदे आणि राज यांच्यात काय बिनसलं?  मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं

Listen to the latest songs, only on JioSaavn.com