जाहिरात
2 months ago
मुंबई:

Rain Update : मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे सकाळी साधारण 4 ते 7 या कालावधीत ठाण्यापासून लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर हळूहळू लोकल सेवा पूर्वपदावर येत असल्याचं समजतंय. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परिणामी कार्यालयात जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. रत्नागिरी, पुणे, सोलापूर, मराठवाड्यासह विदर्भाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे तीन दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार असून गोवा, कर्नाटकसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. तर अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा इशारा हवामान खात्याना दिला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अधिवेशनाचं कामकाज एक दिवसांनी वाढवावं, वडेट्टीवारांची मागणी

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधी पक्ष कामकाजात सक्रिय आहे.  कामकाज मोठ्या प्रमाणात राहिले आहे. संपूर्ण कामकाज होण्यासाठी आणखी एक दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढवावा,   अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात केली.

अलिबाग मुरुड मार्गावरील छोट्या पुलाचा काही भाग खचला

अलिबाग मुरुड मार्गावरील छोट्या पुलाचा काही भाग खचला

मुरुड तालुक्यातील चिकणी येथील पुल खचला आहे. कालच्या अतिवृष्टीने पूल खचल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. बॅरिगेटींग करून खचलेल्या बाजूकडून वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

या मार्गावर आता एकेरी वाहतूक सुरू आहे. 

पावसामुळे ओबीसी सर्वपक्षीय बैठक रद्द...

पावसामुळे ओबीसी सर्वपक्षीय बैठक रद्द...

राज्यासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे, आज मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे

राज्यात आज सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज

कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा तर मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील अतिवृष्टीचा अंदाज 

मध्य महाराष्ट्रातील घाट माथे सोडता इतर ठिकाणी देखील मुसळधार पावसाचा इशारा  

मराठवाड्यासाठी सर्वत्र यलो अलर्ट जारी, सर्वच जिल्ह्यात पावसाचा अंदाज, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता 

विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळसाठी आॅरेंज अलर्ट जारी 

विदर्भातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज

पुण्याच्या वेधशाळेकडून अलर्ट

पुढच्या 24 तासासाठी पुणे वेधशाळेने महाराष्ट्राची चार रंगांमध्ये विभागणी केली आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण पुण्यासह कोकण विभागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील प्रशासनाने तयारीत राहावं. असं पुणे वेधशाळेने सुचवलं आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये हिरवा अलर्ट देण्यात आला आहे. तिथे विजांच्या कडकडाटसह पाऊस पडणार आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र येलो अलर्ट आहे. या भागामध्ये पुढच्या 24 तासात 40 ते 50 मिलीमीटर पाऊस पडेल. विशेषतः ज्या भागात पाऊस नाही तिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 400 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

सिंधुदुर्ग जिल्हयात काल 270 मिलिमीटर पाऊस पडला असून दरवर्षी असा पाऊस पडतो. जिल्हयात एकूण 400 लोकांना स्थलातरित केलं असून त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात खराब झाल्या आहेत. तसेच घराचं नुकसान झालं असून त्याचे पंचनामे करण्याचे आदेश नारायण राणे यांनी दिले आहेत. 

उत्तर कोकणासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी

उत्तर कोकणासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी 

मुंबईतही आज अनेक ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा 

ठाणे, रायगड, पालघरसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी 

राज्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

राज्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

विभागनिहाय पावसाची आकडेवारी, झालेलं नुकसान आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची फडणवीसांनी माहिती घेतली आहे. देवेंद्र फडणवीस विधानसभेत निवेदन करण्याची शक्यता आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावर येणारी अनेक विमानं वळवण्यात आली

मध्यरात्री 2.30 ते 3.45 पर्यंत झालेल्या पावसाचा परिणाम हवाई वाहतुकीवर 

कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावर येणाऱ्या फ्लाईट्स अहमदाबाद, हैदराबाद आणि इंदूरला वळवण्यात आल्या आहेत. जवळपास 27 विमानं दुसरीकडे वळवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, अनेक वळवण्यात आलेली विमानं उशिराने येत असल्याने प्रवाशांनी विमानाचे डिटेल्स तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

वसई -विरार- नालासोपारा परिसरात मुसळधार पाऊस, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्राच्या परिसरामध्ये गेल्या एक तासापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर महानगरपालिका क्षेत्रातील सखल भागामध्ये पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास समुद्राला मोठे उधाण आहे. यावेळी साडेचार ते पाच फुटापर्यंत उंचीच्या लाटा समुद्रात येऊ शकता. त्यामुळे समुद्राला भरती येण्याच्या वेळेपर्यंत जर पावसाचा जोर कायम राहिला तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याबाबत खबरदारी घेतली असून एनडीआरएफ जवानांच्या दोन तुकड्या वसई आणि पालघर या ठिकाणी तैनात करण्यात आल्या  आहेत.  तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये देखील सकाळपासून पावसाची रिप रिप सुरू आहे.

गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 1410 मिलीमीटर पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तुफान पाऊस

गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 1410 मिलीमीटर पाऊस पडला असून 24 तासांत सरासरी 156.70 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गुहागर वगळता सर्वच तालुक्यांमध्ये 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दापोलीत 202 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूरमध्ये 150 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद आहे. सध्या जिल्ह्यातील 2 नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली नदीने  इशारा पातळी ओलांडली आहे. 

पावसामुळे आमदारांसह कर्मचारीही लेट, विधिमंडळ काही काळासाठी तहकूब होण्याची शक्यता

लोकप्रतिनिधी आणि शासकीय कर्मचारी पोहचले नसल्यामुळे विधीमंडळ कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्याची शक्यता आहे. सभागृह सकाळी 11 वाजता सुरू होतं. पण अनेक आमदार आणि विधीमंडळ कर्मचारी अद्याप विधीमंडळ आलेले नाहीत. 

मुंबई विद्यापीठाने IDOL च्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाने IDOL च्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाने  Institute of Distance and Open Learning च्या परीक्षा ढकलल्या आहे. आज 8 जुलै रोजी आयडॉलच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र मुसळधार पाऊस आणि लोकल रखडल्याने प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आज 11 ते 2 या वेळेत घेण्यात येणाऱ्या परीक्षा 13 जुलै रोजी घेण्यात येतील. वेळ आणि ठिकाणी आधीनुसारच असेल, असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. 

कुर्ला स्टेशन बाहेर प्रवाशांचे हाल सुरूच

कुर्ला स्टेशन बाहेर प्रवाशांचे हाल सुरूच, बेस्टच्या गाड्या वेळेवर नसल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे रिक्षा चालकांकडून नकार दिला जात आहे. 

कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये रखडली

कोल्हापूरहून मुंबईला जाणारी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये रखडली आहे. मुंबईत रेल्वेसेवा बंद असल्यानं अंबरनाथच्या सायडिंगला एक्स्प्रेस उभी करण्यात आली आहे. सकाळपासून एक्स्प्रेस उभी असल्यानं प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागला. 

प्रवाशांचे हाल...

रायगडावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका

रायगडावर तुफान पावसामुळए रायगडावर पर्यटक अडकले होते. रात्री उशिरा पर्यंटकांची सुटका करण्यात आली. रायगडावरील महादरवाजाजवळ पर्यटक अडकले होते. 

पुढील 4 तास धोक्याचे, मुंबई उपनगरासह ठाण्याला मुसळधार पावसाचा इशारा

पुढील तीन ते चार तास मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन तासानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज आहे. 

मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात मागील 24 तासात काही भागात अतिवृष्टीही झाल्याचं समोर येत आहे. 

सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद

मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचलं आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. आज देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात येत आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शाळेला सुट्टी जाहीर

रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असून सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मराठवाड्यातही हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाचा निर्णय, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्राची सुट्टी

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाचा निर्णय 

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, मुंबईतील (BMC क्षेत्र) सर्व BMC, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्राची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन अधिवेशनाचा निर्णय जाहीर केला जाईल. 

मुसळधार पावसामुळे मुंबईतून सुटणाऱ्या या गाड्या रद्द

मुंबई विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर आज पाणी साचल्यामुळे, खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत:

1) 12110 (MMR-CSMT)  

2) 11010 (पुणे-सीएसएमटी) 

3) १२१२४ (पुणे सीएसएमटी डेक्कन) 

4) 11007 (पुणे-सीएसएमटी डेक्कन) 

5) १२१२७ (सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस)

Switch To Dark/Light Mode
Previous Article
हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्करली शरणागती?
Rain Update : अधिवेशनाचं कामकाज एक दिवसांनी वाढवावं, वडेट्टीवारांची मागणी
Good news for Mumbai! You can now register property at any joint sub-registrar office
Next Article
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मालमत्तेच्या दस्त नोंदणीसाठी हद्दीची अट रद्द