जाहिरात
This Article is From Apr 19, 2024

धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्र्याचा मुलगा पक्ष सोडणार

धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्र्याचा मुलगा पक्ष सोडणार
धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्र्याचा मुलगा पक्ष सोडणार
धाराशिव:

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात काँग्रेस पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. आता काँग्रेसचे धाराशिव जिल्ह्यातील बडे नेते आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनिल चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मधुकरराव चव्हाण यांनी सोलापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर चव्हाण पक्ष सोडणार याची चर्चा सुरू झाली. आता त्यांचा मुलगा सुनिल हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. चव्हाण यांचे तुळजापूर विधानसभा मतदार संघात मोठी ताकद आहे. चव्हाण यांच्यामुळे तुळजापूर हा काँग्रेसचा गड झाला होता.   

LIVE UPDATE LOKSABHA 2024 - पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात

बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश 

धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील या आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहाणार आहेत. यावेळी सुनिल चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुनिल चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आहेत. त्याचबरोबर ते जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या पदावर देखील राहिले आहेत. 

रक्षा खडसेंनी डाव टाकला, रोहिणी खडसेंनी एका वाक्यात विषय संपवला

मधुकरराव चव्हाण काँग्रेसचे जेष्ठ नेते 

मधुकरराव चव्हाण हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहे. त्यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणाच्या प्रवाहापासून दुर झाले होते. तुळजापूर हा मतदार संघ त्यांनी काँग्रेसचा गड केला होता. सलग चार वेळा यामतदार संघातून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. काँग्रेस सरकारच्या काळात ते कॅबिनेट मंत्री होते. शिवाय विधानसभा निवडणुकीचा काँग्रेसचा नारळ याच मतदार संघातून फोडला जात होता. 

तिरंगी लढतीमध्ये इतिहास बदलण्याचं आंबेडकरांसमोर आव्हान

फडणवीस आणि चव्हाण भेट 

मधुकरराव चव्हाण यांनी सोलापूरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी धाराशिव लोकसभेतून महाआघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र त्यावेळी चव्हाणांनी उपस्थिती लावली नाही. उलट ते फडणवीसांच्या भेटीला आले. चव्हाण यांनी जरी अजून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला नसला तरी त्यांच्या मुलाने मात्र पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. मराठवाड्यातील एकामागून एक नेते काँग्रेसला सोडून भाजपचे कमळ हातात घेत आहेत. याआधीही अशोक चव्हाण, बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com