मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज 13वा दिवस आहे...गॅझेट नोंदीनुसार 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप जारी करावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे यांच्या मागणीनंतर राज्य सरकारच्या वतीने कोणाच्या दुसऱ्या ताटातील हिसकावून दिले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे....तर आजपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे...तसंच सरकारच्या शिष्टमंडळाकडून आज कुणी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी येतं का हेही पाहणं महत्वाचं असेल...दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावर जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची आज पत्रकार परिषद होणार आहे...त्या काय बोलणार हे देखील महत्त्वाचं आहे..पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरातील पाबळ चौकात मराठा समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले... मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले...यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले...