मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू असून मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड आणि मंत्री रवींद्र चव्हाण हे वर्षावर दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि सरकारची पुढील रणनीती यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.