छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहराजवळ शहागड फाट्यावरती शिळे चिकन खाल्ल्यानं चौदा जणांना विषबाधा झाली आहे. यात एका महिलेचा मृत्यू ही झालाय तर इतर तेरा जणांवर उपचार सुरु आहेत. सर्व विटभट्टी कामगार हे मध्य प्रदेशातले आहेत आणि शहागड फाट्याजवळ ते काम करतात.