Chhagan Bhujbal यांचा Dhananjay Munde यांना फोन, दोघांमध्ये कोणत्या विषयावर झाली चर्चा? NDTV मराठी

बीडमध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा थेट इशारा माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी दिला आहे. येत्या 17 तारखेला बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याला ते स्वतः उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी मला फोनवरून आमंत्रण दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठा समाजाचा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणावर गदा आली तर ठाम विरोध करू, असा आक्रमक पवित्रा धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

संबंधित व्हिडीओ