शेतकऱ्यांच्या घामातून आणि दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातून उभा राहिलेला वैद्यनाथ साखर कारखाना विकण्यात आलाय. तब्बल 132 कोटींना हा कारखाना विकल्याची चर्चा असून, सर्वात धक्कादायक म्हणजे सभासद आणि शेतकऱ्यांना याची माहिती देण्यात आली नाही. सहकाराचा पाया रचणाऱ्या या संस्थेचा वारसा आता कोणाच्या हातात गेला? आणि मुंडे कुटुंबाच्या डोळ्यांसमोरच हा व्यवहार झाला का? शेतकऱ्यांचा विश्वास, सहकाराचा आत्मा, आणि परळीची अस्मिता या सर्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.. पाहुयात यावरील एक स्पेशल रिपोर्ट...