अफगाणिस्ताने परराष्ट्र मंत्री सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत.... रविवारी मुत्ताकी उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये देवबंदमधल्या दारुल उलूममध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठी गर्दी झाली होती... भारतातलं हे स्वागत पाहून आनंद झाल्याचं त्यांनी सांगितलं.. दारुल उलूममध्ये मुत्तकी यांना 15 उलेमांच्या उपस्थितीत हदीसची सनद देण्यात आली. हदीसची सनद मिळाल्यानंतर मुत्तकी यांच्या नावाआधी मौलाना लावता येणारेय.. आज त्यांनी अफगाण दूतावासाला भेट दिली. यावेळी अफगाणी शीख आणि हिंदूनी मुत्ताकी यांची भेट घेतली. यावेळी त्यांना अफगाणी पगडी आणि शाल भेट देण्यात आली. या भेटीत अफगाणी शीख आणि हिंदूंनी आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. भारत अफगाण व्यापारासाठी व्हिसाची अडचण दूर करावी अशी मागणी व्यापारी समूहाने केली. वाघा आणि अटारी बॉर्डर बंद असल्यामुळे भारत अफगाण व्यापाराला मोठा फटका बसलाय. मुत्ताकी यांच्या भारत भेटीनंतर ही अडचण दूर होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.. या भेटीत भारत अफगाण सांस्कृतिक विषयांवरही चर्चा झाली. अफगाणिस्तानातील शीख गुरुद्वारांच्या जमिनी अफगाणी शीखांना परत कराव्यात अशी मागणी करण्यात आलीय. काल मुत्ताकी यांनी देवबंदचा दौरा केला होता.