Nobel Prize in Economics 2025 |एक ब्रिटीश,दोन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर

अर्थशास्त्रातील २०२५साठीचा नोबेल जाहीर झालाय.एक ब्रिटीश आणि दोन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांना हा पुरस्कार घोषित कऱण्यात आलाय. जोएल मोकिर, पीटर हॉविट आणि ब्रिटनच्या फिलीप अघियन या तिघांना नवोपक्रमामुळे आर्थिक विकास कसा होतो हे दाखवून दिल्याबद्दल नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.नवी उत्पादनं आणि उत्पादन पद्धती सतत जुन्या उत्पादनांचा जागा घेत असतात आणि ही प्रक्रिया कधीही संपत नाही. हा शाश्वत आर्थिक विकासाचा आधार आहे आणि त्यामुळे जगभरातील लोकांचं जीवनमान आरोग्य आणि राहणीमान सुधारत राहतं हे त्यांच्या संशोधनातून त्यांनी दाखवून दिलं.

संबंधित व्हिडीओ