काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर अॅटम बॉम्ब टाकला. मतदार यादीतला मोठा घोळ पत्रकार परिषदेतून मांडला.. यावेळी एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नोंदणी असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं. असाच प्रकार आता नागपुरातही उघडकीस आलाय. नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील प्रभागांमध्ये प्रारुप मतदार यादीत मोठे फेरफार झालेत. एका छोट्याशा घरात तब्बल दोनशे मतदार असल्याचं यादीत दिसतंय.. पण प्रत्यक्षात या घरातून दोनशे मतदारांची नोंदणी झालीय का? मतदार यादीतील ही फसवणूक नेमकं कोण करतंय? राहुल गांधी म्हणतायत तसं खरंच मतदार यादीतून मतांची चोरी केली जातेय का ? पाहुयात NDTV मराठीचा स्पेशल रिपोर्ट..